Breaking News

मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग : गोऱ्हेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्याचा प्रशासकीय कारभार मुंबई मंत्रालयातून हाकला जातो. मात्र, याच मंत्रालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव स्तरावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपसंचालक पदावर असलेल्या महिलेचा विनयभंग केला. ‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव’, अशा प्रकारचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवांनी केले आहे.

Advertisements

त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *