भाजपमध्ये फूट : अकोल्यात वंचितची कमाल

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेपासून दूर आहे. ही परिस्थिती अकोला जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांच्या चुरसपुर्ण लढतीत वंचितने बाजी मारली. यात भाजपच्या दोन मतांच्या साथीने वंचितने चारही पदांवर झेंडा फडकवला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फुट पडली आहे. आज भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले. तर दोन सदस्यांनी वंचितला मतदान केले आहे. या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला.

कोण झाले सभापती?

विशेष म्हणजे वंचितने चारही महिला उमेदवार दिले. वंचित बहूजन आघाडीच्या रिजवाना परवीन या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती झाल्या आहेत. तर समाजकल्याण सभापतीपदी आम्रपाली खंडारे विजयी झाल्यात. तर विषय समितीच्या सभापती पदांवर वंचितच्याच माया नाईक आणि योगिता रोकडे विजयी झाल्यात. यावेळी वंचितच्या विजयी उमेदवारांना 27 मतं मिळालीत. तर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांना 26 मतं मिळाली आहे.

About विश्व भारत

Check Also

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *