Breaking News

खासदार राजेंद्र गावित अडचणीत ; १६ तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गावित यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबईतील उद्योग क्रांती केंद्र या संस्थेचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गावित यांच्यासह या संस्थेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Advertisements

आरोप फेटाळले

Advertisements

खासदार गावित यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे, सर्व मला बदनाम करण्यासाठी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रकरण काय?

फसवणूक झालेल्या तरुणांनी सांगितल्याप्रमाणे, पालघर जिल्ह्यातील तब्बल ८०० बेरोजगारांना स्वंय रोजगारनिर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना, वीटभट्टी आणि इतर व्यवसाय करणाऱ्या बेरोजगारांसाठीही या योजनेचा लाभ येईल, असे म्हटले आहे.लाभार्थ्यांना खासदार राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २४ जुलै रोजी टेम्पो सेवा, फळभाजी विक्री, खाद्यपदार्थ अशा एकूण ५ प्रकारच्या वाहनांचा लाभ देण्यात येणार होता. वाहनांसोबतच ५० लाखांपर्यंतचे कर्जही देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अमित शाह ने ग्वालियर लोकसभा चुनाव प्रबंधन समिति की बैठक ली

अमित शाह ने ग्वालियर लोकसभा चुनाव प्रबंधन समिति की बैठक ली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

कई बड़े नेताओं के लिए भी सीट नहीं ले पाई कांग्रेस?दबाव बनाने में सफल रहे अखिलेश

कई बड़े नेताओं के लिए भी सीट नहीं ले पाई कांग्रेस? दबाव बनाने में सफल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *