औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. याचा अर्थ जर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी प्रसारमाध्यमांत माझ्या राजीनाम्याची ब्रेकींग न्यूज येईल. त्यानंतर मैदानात त्यांनी यावे. कोण गदा घेऊन येतो, कशा पद्धतीने येतो, त्याला आमची ढाल-तलवार कशा पद्धतीने लढा देईल हे सर्वांना दिसेल, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते माध्यमांना आज बोलत होते.
सत्तार म्हणाले, नो ड्रग्ज मोहीमेद्वारे आयोजित क्रिकेट स्पर्धेत इम्तियाज जलील यांची विकेट मी घेतली. परंतु त्यांच्याच माध्यमातून मी (चंद्रकांत खैरे) एक विकेट घेतली होती. आता ती विकेट पडलेली आहे. ते आता काॅंव काॅंव करीत आहेत.
रिमोट शिंदेंकडे
इम्तियाज जलील यांची दांडी गुल झाली.दांडी गुल करणे सोपी गोष्ट नाही. पण जे जे पुढे बॅटींगला येतील त्यांनी ध्यानात ठेवावे. कुणाची विकेट कधी घ्यायचा, कशा परिस्थिती घ्यायचा हे मला चांगले ठावूक आहे. माझा रिमोट कंट्रोल घ्यायचा सांगितला त्याचा विकेट मी घ्यायला बसलो, असेही सत्तार म्हणाले.