नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईसंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.
नवीन दर काय?
– मुंबईत पूर्वी 1844 मध्ये लोक व्यावसायिक सिलिंडर घेत असत, मात्र आता 1696 रुपये मोजावे लागतात.
– 19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये आहे. पूर्वी तो 1859.5 रुपये होता.
– कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1846 रुपये असेल. पूर्वी लोकांना 1995.50 रुपये मोजावे लागत होते.
– चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1893 रुपये आहे. यापूर्वी यासाठी 2009.50 रुपये मोजावे लागत होते.
14.2 किलो सिलेंडरचा दर
कोलकाता 1079 रूपये
दिल्ली 1053 रूपये
मुंबई 1052 रूपये
चेन्नई 1068.5 रूपये
हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या दुकानात व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा सलग सहावा महिना आहे जेव्हा व्यावसायिक गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 25.5 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात होऊ शकते. जरी ते हळूहळू होईल.
दरम्यान सणासुदीच्या हंगामामुळे आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत भारतात इंधनाची विक्री वाढली. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत वर्ष-दर-वर्ष 22-26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या सहामाहीत महिना-दर-महिना वाढ झाली आहे. 1 ते 15 ऑक्टोबर 2022 दरम्यान पेट्रोलची विक्री 22.7 टक्क्यांनी वाढून 1.28 दशलक्ष टन झाली आहे. तर याच कालावधीत 2021 मध्ये 1.05 दशलक्ष टन वापर झाला होता असे अहवालात म्हटले आहे.