Breaking News

कुरकुऱ्याचा ट्रक नदीत कोसळला

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदेजवळ तापी नदीच्या पुलावरून कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनरला वाचवण्यात यश आले आहे.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पुणे येथून मध्य प्रदेशकडे एक आयशर कुरकुरे घेऊन जात होता. हा आयशर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदीच्या पुलावर आला असता चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक कठडे तोडून तापी नदीच्या पात्रात कोसळला. या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने नदीच्या लगतचे शेतकरी तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. दरम्यान नरडाणा पोलीस देखील घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. तर वाहतूक देखील ठप्प झाली. शोध मोहीम राबवणाऱ्या तरुणांनी नदीपात्रामध्ये जाऊन चालक आणि क्लिनर यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र पाण्यातून वाहत जाणाऱ्या एकाला मच्छीमारांनी बाहेर काढले.

About विश्व भारत

Check Also

महिलाओं को भारत से बचने पाकिस्तानी पत्रकार की घिनौनी सलाह

महिलाओं को भारत से बचने पाकिस्तानी पत्रकार की घिनौनी सलाह टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

बिजली करंट से बैनगंगा-गोसीखुर्द डैम मे मछलियों का शिकार

बिजली करंट से बैनगंगा -गोसीखुर्द डैम मे मछलियों का शिकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *