Breaking News

तुळशी विवाहानंतर लग्न योग : जूनपर्यंत ५८ मुहूर्त

Advertisements

कार्तिक एकादशीला दीपावली उत्सवाची सांगता होत असते.५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा अर्थात ८ नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची रुढ परंपरा आहे. ५ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्ती आणि शनी प्रदोष व शाकव्रत समाप्ती असल्याने या दिवसापासून विवाह सोहळे सुरू होणार आहेत. यावर्षी जवळपास ५८ विवाह मुहूर्त असल्याचे समजते.

Advertisements

भारतीय पंचांगानुसार तत्कालीन पर्यावरणीय वर्तमाननुसार पावसाळा आटोपल्यानंतर सोयीनुसार म्हणून वैवाहिक सोहळे केले जातात. त्यानुसार वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून देव शनी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत देव उठणे, चातुर्मास पाळला जातो. या काळात भगवान विष्णू निद्राधीन असतात, असा समज आहे. विष्णू आणि लक्ष्मी या विवाहाच्या देवता असल्याने या काळात वैवाहिक सोहळे मौंजीबंधन साजरे करू नये, अशी भावना प्राचीन परंपरेनुसार भारतात आहे. आज ही प्रथा पाळली जाते. यंदा देव उठणे, एकादशी ४ नोव्हेंबरला येत असून द्वादशीला भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. आणि तेव्हापासून विवाह मुहूर्त काढण्याची परंपरा अखंडपणे चालत आलेली आहे.

Advertisements

विवाह मुहूर्ताच्या तारखा

नोव्हेंबर २५, २६, २८, २९
डिसेंबर ‌२, ४, ८, ९, १४, १६, १७, १८, १९
जानेवारी १८, २६, २७, ३१,
फेब्रुवारी ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८
मार्च ९, १३, १७, १८
एप्रिल ३०
मे २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०
जून १, ४, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:101) ईश्वर चराचर जगत में सर्वव्यापक परमात्मा अगोचर अनंन्त साकार एवं निराकार ब्रह्म स्वरूप है

भाग:101) ईश्वर चराचर जगत में सर्वव्यापक परमात्मा अगोचर अनंन्त साकार एवं निराकार ब्रह्म स्वरूप है …

(भाग:100) ईश्वर में संपूर्ण विश्वास और समर्पण भाव होगा समस्त दुखों का नाश! यह है गीता ज्ञान

भाग:100) ईश्वर में संपूर्ण विश्वास और समर्पण भाव होगा समस्त दुखों का नाश! यह है …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *