Breaking News

नागपुरात मोबाईलमुळे अपघात : कानाला मोबाईल आणि हातात कारचे स्टेअरिंग

नेहमीच वाहतुकीचे नियम पाळा, असे सांगितले जाते. अनेकांकडून याला बगल दिला जातो. नागपुरात अशीच नियमांचे उल्लंघन झाल्याने अपघात झाला.

कानाला मोबाईल लागलेला, हातात कारचे स्टेअरिंग, फोनवर बोलता- बोलता अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि विपरित घडले. फोनवर बोलणे एका महिला कारचालकास चांगलेच महागात पडले. कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने तीन दुचाकीस्वारांना उडवले आणि नंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. हा विचित्र अपघात गुरुवारी दुपारी चार वाजता गिट्टीखदान चौकात झाला. सुनिधी फ्रान्सिस (३२, भूपेशनगर) असे आरोपी महिला कारचालकाचे नाव आहे. तर रामविलास गुप्ता असे गंभीर जखमी भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.

 

गिट्टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामविलास गुप्ता याचे गिट्टीखदान चौकात पदपथावर भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. तो गुरुवारी दुपारी चार वाजता ग्राहकांशी बोलत उभा होता. या दरम्यान, आरोपी महिला कारचालक सुनिधी फ्रान्सीस ही महिला भरधाव कार चालवत आली. तिचा एक हात कारच्या स्टेअरिंगर तर दुसऱ्या हाताने कानाला मोबाईल लावलेला होता. मोबाईलवर बोलत असतानाच सुनिधी हिचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तिने अनियंत्रित कार सांभाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या तीन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर भरधाव कार एका भाजीपाल्याच्या दुकानात घुसणार तोच सुनिधी यांनी कार झाडावर धडकवली. त्यामुळे कारचे जरी मोठे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळला. सुनिधी ही कारमधून खाली उतरली आणि नातेवाईकांना भ्रमणध्वनी करून अपघाताबाबत माहिती देत होती. दरम्यान तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली. जखमी झालेल्या भाजीपाला विक्रेता रामविलास गुप्ता आणि किरकोळ लागलेल्या दोघांना नागरिकांना रुग्णालयात दाखल केले. अपघात झाल्यानंतर काही वेळांनी गिट्टीखदान पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळावर हजर झाले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी रामविलास गुप्ताच्या तक्रारीवरून या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करून आरोपी महिला सुनिधी फ्रान्सीस हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

 

भरधाव कारची पादचाऱ्याला धडक

 

नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत भरधाव कारचालकाने पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचाराऱ्याचा मृत्यू झाला. संजय पदम नितनवरे (४३, रा. संत लहानुजीनगर, जरीपटका) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

संजय नितनवरे हे १२ जुलैला रिंग रोड येथील विवेक पान पॅलेस समोरून पायी घरी जात होते. यावेळी, भरधाव येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान २४ जुलैला रात्री ११ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी संजय नितनवरे यांची पत्नी सारिका संजय नितनवरे (३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

About विश्व भारत

Check Also

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा!

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हरिद्वार। भारत …

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *