Breaking News
Oplus_0

‘पीडब्लूडी’ लक्ष देणार काय?चक्क १८ लाखांचा पूल गेला वाहून!

पावसाच्या पुराने रस्ते आणि पूल वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटना घडली. सोबतच आता मोहाडी तालुक्यातील नाल्यावरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा पूल १८ आठवडेही टिकू शकला नाही. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोहाडी तालुक्यातील चिचखेडा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०२२-२३ चे स्मशानभूमीवरील नाल्यावर तब्बल १८,७३,४१६ रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामध्ये या पुलाला ठिकठिकाणी तडे जाऊन पावसाने हा पूल वाहून गेला. सदर बांधकाम दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी सुरू झाले असून दिनांक १० जून २०२४ रोजी काम पूर्ण झाले होते. मात्र दीड महिन्यातच पावसाने खचून गेल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘पीडब्लूडी’ विभाग लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर बांधकामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून जनतेच्या पैशाचे अपव्यय होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सदर काम सुरू असतानाच गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत साचिवांकडे व अभियंत्यांकडे तोंडी तक्रार केली होती मात्र भ्रष्टाचाराने आपले हात ओले केले असलेल्या प्रशासनाने अजिबात लक्ष दिले नाही. आता मात्र साधा एक पूरसुद्धा एक महिन्याआधी तयार झालेला पूल सहन करू शकला नाही. अवघ्या ४४ दिवसांत वाहून गेले. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर सार्वजनिक पैशाचा अपहार व बांधकामाकडे गुन्हेगारी दुर्लक्ष केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. प. सदस्य रूपेश सिंदपुरे, अनिल गाढवे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.

सदर प्रकरणावर एका आठवड्यात कारवाई झाली नाही तर प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी कॉम्रेड वैभव व गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या नावे खासगी व्यक्तीने घेतली नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी …

४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक : बोगस अपंग प्रमाणपत्राची शोध मोहिम

निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बनावट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *