Breaking News

बैल चारत असताना वाघाचा हल्ला : शेतकरी ठार

Advertisements

बैल चारत असताना वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली. सुधाकर भोयर (वय ५० रा.राजगाटा चेक) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Advertisements

सुधाकर भोयर हे आज बैल घेऊन शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. वारंवार वाघाच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. आज हल्ला करणारी टी-६ वाघीण असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वाघीणीने आतापर्यंत ६ जणांचे बळी घेतले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

काम के बहाने कमरे में बुलाया और दुष्कर्म किया…महिला ने बनाया वीडियो : अब अपराधी की खैर नहीं?

पीडित महिला ने बताया कि वह दूसरों के घर पर काम करती थी। छह-सात माह …

एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *