Breaking News

मुलगा पाण्यात पडला, वाचवण्यासाठी आईचीही उडी…

Advertisements

पोटच्या गोळ्यासाठी आई जगातील सर्व संकटांना तोंड देऊ शकते, हे म्हणतात ते काही खोटं-नाट नाही. आई मुलांसाठी जीवही द्यायची वेळ आली तरी मागे हटत नाही. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात असेच एक प्रकरण घडले आहे.

Advertisements

एका आईने मुलाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. खूप प्रयत्न करूनही ती ना मुलाला वाचवू शकली ना स्वतःला वाचवू शकली. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या लोकांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.

Advertisements

माहितीनुसार, उपरोक्त घटना डुंगरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील डोवडा येथील दारा खांडा गावात शुक्रवारी घडली. दोवडा एसएचओ कमलेश चौधरी यांनी सांगितले की, दियालाल परमार यांची पत्नी गावातील धरणावर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा दोन वर्षांचा मुलगा मोहित परमार हा पाण्यात पडला.

२ वर्षाच्या मुलाला बुडताना पाहून त्याच्या आईने त्याला वाचवण्यासाठी थेट पाण्यात उडी घेतली. तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीने हा संपूर्ण प्रकार पाहिला. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात संधर्ष करत होती. हे सर्व पाहून मुलीने धावत जाऊन गावकऱ्यांना आणि मोहितच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली मात्र तोपर्यंत आई व मुलगा दोघेही बुडाले होते.

ग्रामस्थांनी दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गावात पोहोचून घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेऊन डुंगरपूर रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. शनिवारी पोलिसांनी शवविच्छेदन करून आई-मुलाचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मृत महिल्ला एक मोठी मुलगी आहे. बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

RSS सेवा प्रमुख को घर से घसीटकर ले गई पुलिस, गुस्साए लोगों ने थाने में किया हनुमान चालीसा का पाठ

RSS सेवा प्रमुख को घर से घसीटकर ले गई पुलिस, गुस्साए लोगों ने थाने में …

रात 3 बजे तक पुलिसकर्मियों ने किया कॉम्बिंग गश्त : शहर के एक-एक गली में पहुंचे

छत्तीसगढ़ रात 3 बजे तक पुलिसकर्मियों ने किया कॉम्बिंग गश्त, शहर के एक-एक गली में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *