Breaking News

राज्यात १०९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गृह विभागाने १०९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांची ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर बापू बागंर यांची साताऱ्याच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार राज्यातील पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रतीक्षेतील अशा एकूण १०९ अधिकाऱ्यांना आज गृह विभागाने पदस्थापना दिली. सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक मुंबई शहर उपायुक्तपदी झाली आहे. मनोज पाटील यांनाही मुंबई शहरातच पदस्थापना दिली आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्वप्ना गोरे यांची बदली पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड आमि नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांची सोलापूर शहर पोलिस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांना पदस्थापना मिळालेली नव्हती. अखेर गृह विभागाने त्या पोलीस अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली आहे.

About विश्व भारत

Check Also

शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार

जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल …

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *