Breaking News

अमरावतीत विवाहितेची विष घेऊन आत्महत्या

Advertisements

अमरावतीमधील विलासनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी समोर आली. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विवाहितेच्या पती व सासूविरुद्ध कौंटूबिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

Advertisements

विलास विजय रामटेके असे गुन्हा दाखल झालेल्या मृत विवाहितेच्या पतीचे नाव आहे. विलासने तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर विलास हा सतत मुलीला मारहाण करायचा, असे मुलीने सांगितले होते. ६ नोव्हेंबरला विलासने तक्रारदार महिलेच्या लहान मुलीला फोन करुन म्हटले की, तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन जा. मात्र, त्यावेळी तक्रारदार महिला ही कामाला गेली होती.

Advertisements

लहान मुलीने तीच्या आईला घरी आल्यावर सायंकाळी सांगितले. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास विलासने फोन करुन तक्रारदार महिलेला सांगितले की, तुमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे, मी तुम्हाला घ्यायला येतो. मात्र तक्रारदार महिलेने जाण्यास नकार दिला. ७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता तक्रारदार महिला इर्विनच्या शवगृहात पोहोचली असता मुलगी मृतावस्थेत पडून होती. मुलीच्या मृत्यूला तिचा पती व सासू जबाबदार असल्याची तक्रार मृताच्या आईने गाडगेनगर पोलिसांत दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *