Breaking News

नागपूर जिल्हा परिषदेत घोटाळा : मृतकांच्या नावाची पेन्शन नातेवाईकांच्या खात्यात, महिन्याला 5 लाखाची कमाई

जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा उघडकीस आलाय. मृतकांच्या नावाची पेन्शन रक्कम जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली जात होती. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. यात कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आले.जिल्हा परिषद सीईओ यांनी चौकशी समिती गठीत केली. या पेन्शन घोटाळ्यात आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महिला लिपिकाकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी ‘हयात’ असल्याचे दाखवीत त्यांची पेन्शन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात त्या वळती करीत होत्या.

गेल्या सात, आठ वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती महिला कर्मचारी रजेवरही गेली आहे. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला मोठा संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आले.

मोठा गैरव्यवहार असल्याचे शिक्षण विभागाकडून आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या आधारे संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आली. चौकशी समितीही गठित करण्यात आली. समिती अहवाल आल्यावर पुढील प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई निश्चित करण्यात येईल, असे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

महिला सरपंचाने स्वतःला गाडले जमिनीत!तहसीलदार…!

कुणी अन्यायाविरुद्ध आंदोलन केले तरी तिकडे लवकर शासकीय यंत्रणा ढुंकूनही पाहत नाही, अशी परिस्थिती सगळीकडे …

तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित : खळबळ

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खुर्द)ग्राम पंचायत सरपंच आणि दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *