लघवीतील बदल, किडनीचे मोठे नुकसान

किडनी आजारांनी त्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. अशावेळी रुग्णांना डायलिसिसची मदत घ्यावी लागते. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे कदाचित प्राणघातकही ठरू शकते.

किडनी डिजीज क्वालिटी ऑफ लाइफ स्टडीमध्ये किडनीच्या २७८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या जवळपास ९८% लोकांना आपल्या शरीरात किमान एक लक्षण पाहायला मिळाले. २४% लोकांना छातीमध्ये त्रास जाणवला तर ८३% लोकांना थकवा जाणवला. यापैकी ६९० रुग्णांनी किडनी रिप्लेसमेंट थेरेपी सुरु केली, मात्र त्यातील ४९० रुग्णांचा ही थेरपी सुरु करण्याआधीच मृत्यू झाला. कारण या लोकांनी वेळीच गंभीर लक्षणांकडे लक्ष दिले नाही. डॉक्टरांनी सांगितले की किडनीच्या आजाराची लक्षणे गंभीर झाल्यास रुग्ण क्रॉनिक किडनी डिजीजला बळी पडतो. अशा प्रकरणांमध्ये रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाची गरज असते.

सुरुवातीला ६० वर्षांवरील लोकांना किडनीचा आजार व्हायचा. मात्र आज कमी वयाच्या लोकांनाही या आजाराने घेरले आहे. किडनीच्या आजाराच्या प्रारंभिक लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. काहीवेळा संसर्गामुळे किडनी खराब होते आणि वेळेवर उपचार न केल्यास रुग्णाला डायलिसिसच्या आधाराची गरज भासते. मात्र प्रकरण जास्तच गंभीर असेल तर रुग्णाकडे डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण हेच पर्याय उरतात. अशा परिस्थितीत, लोकांनी किडनीच्या आजाराच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि वेळेवर उपचार घेणे खूप महत्वाचे आहे.

याकडे द्या लक्ष

*लघवी करताना जळजळ होणे
*लघवी करताना ओटीपोटात दुखणे
*दुर्गंधीयुक्त लघवी
*भूक न लागणे
*सकाळी उलट्या होणे
*लघवीमधून रक्त येणे

 

(सूचना : डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

About विश्व भारत

Check Also

औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत : चौकशी कधी?

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे आता गडचिरोलीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात …

मैद्यामुळे अनेक गंभीर आजार : मैद्याऐवजी कोणते पर्याय?

केक आणि ब्रेडपासून ते समोसा, वडापाव, सँण्डवीचपर्यंत अशा आपल्याला आवडणाऱ्या बहुतेक फास्ट फूडमध्ये मैदा वापरला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *