विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवार,११ नोव्हेंबरला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणात येणार आहे.
गडकरी यांच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलसमोरील कार्यालयावर जाणारा मोर्चा शुक्रवारी दुपारी १२ वाजता छत्रपती चौक, एनआयटी गार्डन, सावरकर नगर येथून निघणार आहे, तसेच खासदार कृपाल तुमाने यांच्या भांडेप्लॉट चौक , उमरेड रोड येथील कार्यालयावर जाणारा मोर्चा भांडेप्लॉट चौक येथून दुपारी २ वाजता निघणार आहे. केंद्र सरकारने विदर्भाचे राज्य तात्काळ निर्माण करावे, अन्नधान्न्यावरील जीएसटी तात्काळ मागे घ्यावी, राज्य सरकारने जुल्मी वीज दर रद्द करावे, विदर्भातील ११ ही जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. बल्लारपूर, सूरजगढ रेल्वेमार्ग केंद्र सरकारने तात्काळ मंजुरसह आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मोर्चेकरांची आहे.