‘पीडब्ल्यूडी’च्या कामात 25 लाखांची फसवणूक

सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सचिन साळुंके,रा. आंबेगाव, कात्रज याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. समीर शशिकांत रहाटे (वय 46, रा. मुलुंड) यांनी फिर्याद दिली. समीर यांची एस. आर. ग्लोबल एंटरप्रायझेस नावाने कंपनी आहे. त्यांनी या कंपनीच्याच नावाने पीडब्ल्यूडीचे काम करण्याचे लायसन्स काढले आहे.

लायसन्स काढल्यानंतर कामे मिळविण्यासाठी पीडब्ल्यूडीकडून त्यांना डिजिटल की दिली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता तेथे त्यांची सचिन साळुंकेशी ओळख झाली. त्या वेळी त्याने समीर यांना सांगितले की, तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा भरण्यामध्ये पारंगत असून, अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी ओळखी आहेत. यानंतर त्याने पीडब्ल्यूडीने दिलेली डिजिटल की मागून घेतली. यानंतर विश्वास संपादन करून कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने मागील चार वर्षांत 25 लाख रुपयावर डल्ला मारला.

About विश्व भारत

Check Also

नकली शराब की 350 पेटी जप्त : आयशर वाहन से हो रही थी सप्लाई

नकली शराब की 350 पेटी जप्त : आयशर वाहन से हो रही थी सप्लाई टेकचंद्र …

होटल कर्मियों ने दो ग्राहकों पर डाला खौलता तेल

होटल कर्मियों ने दो ग्राहकों पर डाला खौलता तेल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *