Breaking News

डेंग्यूने बालकाचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील घटना

औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा गावात आठवडाभरापासून अज्ञात तापाची साथ आहे. मंगळवारपासून तापाने फणफणलेल्या प्रणव प्रेमसिंग चव्हाण या अकरा वर्षीय बालकाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जळगावच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

डेंग्यूने या बालकाचा मृत्यू झाल्याचे अहवालावरून दिसून येते. याबाबत सोयगाव तालुका आरोग्य विभागाने दुजोरा दिला. जंगला तांडा येथे तालुका आरोग्य विभागाच्या पथकान ताप आलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले.

यातून मृत बालकाच्या कुटुंबातील मानवी प्रेमसिंग चव्हाण (वय १५), अर्णव प्रेमसिंग चव्हाण (वय ७) व कुणाल राठोड ( वय १२), प्रवीण राठोड (वय १४) अशा चार बालकांना डेंग्यूसदृश्य आजार झाल्याचे आढळले. त्यापैकी मानवी व अर्णव या दोघांना पाचोरा (जि. जळगाव) येथे हलवले असून इतर दोघे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताहेत.

रात्री उशिरा हिवताप नियंत्रण व तालुका आरोग्य विभागाकडून गावात दुर्गंधीच्या ठिकाणी धूरफवारणी करण्यात येणार आहे. गावाजवळ असलेल्या दुर्गंधीयुक्त नाल्यामुळेच गावात डेंग्यू तापाची साथ पसरली, असा दावा आरोग्य विभागाने केलाय.

About विश्व भारत

Check Also

जल्द MC आने व कम उम्र में मां बनने से महिलाओं में इन बीमारियों का खतरा

जल्द MC आने व कम उम्र में मां बनने से महिलाओं में इन बीमारियों का …

अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांत? डॉक्टरांनी दिली २० पदार्थांची यादी

सतत ऊर्जावान राहण्यासाठी शरीराला प्रोटीनची खूप आवश्यकता असते. त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक जण शरीरातील प्रथिनांच्या गरजा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *