Breaking News

नागपुरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Advertisements

नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या झाली होती. तर यानंतर आता नागपुर ग्रामीणमध्ये तिसरी हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे.

Advertisements

नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केली. महत्वाचे म्हणजे तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Advertisements

पहिली घटना

इमामवाडा भागात घडली. रामसिंग ठाकूर असे मृत इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. मृत रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

दुसरी घटना

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोशन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास तिघांनी चाकु आणि लोखंडी रोड रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोशनचा मृत्यू झाला आहे. आरोपी वीरेंद्र. यशोदास आणि अश्विन या तिघांसोबत रोशनचा तिघांसोबत वाद सुरू होता. त्याच वादातून तिघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

तिसरी घटना

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या तिहेरी हत्याकांडानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *