Breaking News

अमरावतीत १५ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात घुसला बाण

Advertisements

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील शासकीय क्रीडांगण परिसरात पंधरा वर्षातील मुलाच्या चेहऱ्यात बाण घुसल्याची घटना घडली आहे. वेदांत गणेशराव डहाले असे जखमी मुलाचे नाव आहे. वेदांतवर दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे.

Advertisements

अमरावतीमधील दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय क्रीडा परिसरात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना वेदांतच्या चेहऱ्यात बाण घुसला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

Advertisements

रुग्णालयात दाखल केलेल्या वेदांतची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मुलाच्या चेहऱ्यातील बाण काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. क्रीडांगण परिसरात क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *