Breaking News

शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

Advertisements

पुण्यातील लोणी खुर्द (मापरवाडी ) परिसरात दत्तात्रेय शंकर घोगरे यांची शेतातील त्यांच्या घराजवळील विहिरीमध्ये शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते.

Advertisements

आजही या शिवारात तीन ते चार बिबट्याची वास्तव आहे, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबरटीचे वातावरण आहे. अनेक वेळा वन विभागास परिसरातील नागरिकांनी माहिती देऊनही वन विभागाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी करत आहे.

Advertisements

मापरवाडी ते निर्मळ पिंपरीरोड वरती सकाळच्या वेळेस लोणी खुर्द परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग हे सातत्याने मॉर्निंग वॉक करीता जात असतात. त्याचबरोबर मापरवाडी शिवारामध्ये दूरवर शेतीचा परिसर असल्यामुळे दिवसा अथवा रात्रीच्या वेळेस शेतीमध्ये पाणी भरण्याकरिता शेतकरी वर्ग जात असतो. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे पडली : जोरदार पावसाची प्रतीक्षा

नागपूरमध्ये रविवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे कुठे भिंत पडली, …

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस : दुष्काळाचे सावट

देशात सर्वच भागात सप्टेंबर महिन्यात पडेल. मात्र, तो एकसारखा राहणार नाही. सरासरी 91 ते 109 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *