सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार चोवीस तास खुले

हजारो-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर नविन वर्षानिमित्त भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे.

दरवर्षी लाखो भाविक नवीन वर्षाची सुरवात ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने करत असतात. यावर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर शनिवार,आज (दि. 31) दिवसभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

यावर्षी सप्तशृंगीगडावर नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक -भक्तांची गर्दी वाढते आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने भगवती दर्शन घेता यावे यासाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विश्वस्त संस्थेच्या मार्फत देण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त गुरुकुंज अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित …

निर्माण श्रमिक को ई-स्कूटर में अनुदान सहायता योजना का लाभ

निर्माण श्रमिक को ई-स्कूटर में अनुदान सहायता योजना का लाभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *