Breaking News

जय महाकाल : नाशकातील त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून खुले

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन व मंदिराच्या देखभालीसाठी 5 जानेवारीपासून बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ७ पासून खुले होणार आहे.

संवर्धनाच्या कालावधीत त्रिकालपूजा, प्रदोष पुष्पपूजा आदी नित्य परिपाठ सुरू होते. मात्र, भाविकांना दर्शनासाठी प्रवेशबंद होता. या कालावधीत भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक शेखर देसर्डा यांनी त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण केलेले चांदीचे दरवाजे गर्भगृहास बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहाल यापुढे दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. दररोज रात्री आरती झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराज शयनासाठी हर्षमहालात येतात, अशी परंपरा आहे. हा महाल म्हणजे सिसम आणि सागवानी लाकडावर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचेही पुन:सौंदर्यकरण आणि नूतनीकरण केलेले आहे. यापूर्वी भाविकांना हर्षमहाल वर्षातून फक्त तीन वेळा पाहता येत होता. आता तो भाविकांना दररोज दर्शनासाठी खुला राहणार आहे.त्यामुळे भाविकांची गर्दी वाढेल.

About विश्व भारत

Check Also

महाकाल भस्म आरती के साथ लालबाग के बादशाह का करेंगे दर्शन

महाकाल भस्म आरती के साथ लालबाग के बादशाह का करेंगे दर्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

कोराडी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे मंत्री बावनकुळे यांच्या घरी गणेशउत्सवानिमित्त कार्यक्रम

🌹🌹॥ जय गुरु ॥🌹🌹   सर्व होते केले असता । सर्व मिळते धरिता हाता ।। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *