Breaking News

समृद्धी महामार्गावर वाघाचे दर्शन : चंद्रपूर ते नाशिक मार्गे मुंबई प्रवास

Advertisements

चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीत अग्रेसर आहे. त्यातच आता हा जिल्हा वाघांचे माहेरघर बनला आहे. मानवासह पशुधनावर वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. नवीन वर्षात चंद्रपूर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केले होते. त्यात एका नर, तर एका मादीचा समावेश आहे. बुधवारी, सायंकाळी नागपूर येथून या वाघांच्या जोडीची स्वारी समृध्दी महामार्गाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने निघाली होती. गुरुवारी पहाटे ही जोडी विश्रांतीसाठी नाशिकमध्ये आली होती. वनविभागाच्या विश्रामगृहात तब्बल सहा तासांच्या मुक्कामानंतर चंद्रपूरचे दोन्ही वाघोबा बोरिवलीच्या दिशेने रवाना झाले.

Advertisements

गत वर्षभरात चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यात तब्बल ५३ ग्रामस्थ ठार झाले आहेत. ब्रह्मपुरी, सावली, चितपल्ली या परिसरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांची गांभीर्यता लक्षात घेत, वाघांना जेरबंद करण्याचा निर्णय चंद्रपूर वनविभागाने घेतला आहे. नववर्षात वनविभागाला दोन वाघ जेरबंद करण्यात यश आले होते. या वाघ-वाघिणीची जोडीला पिंजऱ्यात ठेवण्यासाठी चंद्रपूर ट्रान्झिट सेंटरमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने त्यांना नागपुरातील आंतरराष्ट्रीय गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा!

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा! टेकचंद्र …

गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेची याचिका हायकोर्टात

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *