नागपूर हायकोर्टाने अधिकाऱ्यांवर का ठोठावला 50 हजारांचा दंड?

वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याला अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदियामधील जात पडताळणी समिती सदस्यांवर 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला.

सर्व कागदपत्रे असतानाही प्रमाणपत्र नाकारल्याने न्यायालयाने दंड आकारण्याचा निर्णय घेतला. ही दंडाची रक्कम समितीच्या सदस्यांना चार आठवडयांत जमा करायची आहे. न्या. अविनाश घरोटे आणि न्या. मुकुलिका जवळकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. श्रेयस अजय घोरमारे (१७), असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे.

श्रेयसचे वडील आणि बहिण यांच्याजवळ ‘माना’ अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र आहे. श्रेयसने पंजोबा आणि आजोबांचे १९१४, १९१६ व १९४३ साली दिलेले ‘माना’ अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्रही सादर केले होते. श्रेयसकडे रक्त नात्यातील १६ जात वैधता प्रमाणपत्र आहे. इतके सारे वैध कागदपत्रे असताना जातवैधता पडताळणी समितीने श्रेयसला प्रमाणपत्र नाकारले. समितीने श्रेयसने सादर केलेल्या स्वातंत्र्यापूर्वीच्या जुन्या कागदपत्रांकडे चक्क दुर्लक्ष करून हे कागदपत्र विचारात न घेता त्याचा जात वैधता प्रमाणपत्राचा दावा नाकारला.

न्यायालयाने जातवैधता प्रमाणपत्राच्या या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उच्च न्यायालयाने याप्रकरणी समितीवर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला. याचिकाकर्त्या श्रेयसला चार आठवडयात ‘माना’ अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेशही समितीला दिलेत.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *