नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. आलगोंदी येथे पळसाच्या झाडावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अलगोंदीच्या पोलीस पाटलाने दिली.

 

काटोल तहसीलमधील कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आलागोंदी गावात गोविंदराव पंचभाई यांच्या घरी शेतात रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील भागतराव भोंडवे (५०) आणि मध्य प्रदेशातील प्रभातपट्टण येथील जयदेव मनोटे (५५) आलगोंदी येथे आले होते.

दरम्यान दुपारी जोरदार वादळी पाऊसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी काही जण शेतातील शेतातील पाळसाच्या झाडाखाली उभे होते. नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. त्यात भागवतराव भोंडवे आणि जयदेव मनोटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. रविवारी शहरातही दुपारपासून ढगांनी आकाशात गर्दी केली होती. तापमानातही घट नोंदवली गेली.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *