Breaking News

पुण्यात घेतली फोन-पेवरून लाच : उद्योग निरीक्षकाला अटक

Advertisements

जिल्हा उद्योग केंद्रातील एका निरीक्षकाने चक्क फोन पे-द्वारे हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर शुक्रवारी त्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. चंद्रभान परशुराम गोहाड (वय.57) असे लाचखोर उद्योग निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी गोहाड याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

Advertisements

प्रकरण काय आहे?

Advertisements

फिर्यादी तरुणाने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत खिळे निर्मिती उद्योगासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचा प्रस्ताव बँकेकडे शिफारशीसह पाठविण्यासाठी गोहाड याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तरुणाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 9 जानेवारी रोजी दाखल तक्रारीची पडताळणी केली असता,गोहाड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सुरूवातीला गोहड याने सुरूवातीला 500 रुपये, फोन पे अ‍ॅपद्वारे एक हजार रुपये व शुक्रवारी सापळा कारवाईत त्याने कार्यालयातच दोन हजार रुपयांची लाच घेताना पथकाने पकडले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *