Breaking News

बावनकुळे येणार : आज मौदातील धानल्यात भाजपकडून सरपंचांचा सत्कार

Advertisements

✍️मोहन कारेमोरे

Advertisements

भारतीय जनता पक्षातर्फे मौदा-कामठी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा भव्य सत्कार आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार,14 जानेवारीला दुपारी 12 वाजता मौदा तालुक्यातील धानला या गावात होणार आहे.

Advertisements

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उदघाटन होईल. तर, अध्यक्षस्थानी कामठी मौदा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर असतील.अलीकडेच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या. यात मौदा तालुक्यातील धानला परिसरात मोठ्या संख्येने भाजपचे सरपंच आणि सदस्य निवडून आलेत. यात भाजपला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात पुन्हा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *