Breaking News

कृषीमंत्र्याच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात भ्रष्टाचाराचं पीक : महसूल, कृषी विभागाकडून सामान्यांची गळचेपी

✍️मोहन कारेमोरे

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघामध्येच कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याप्रकरणी तीन जणांना रंगेहात पकडले आहे.

यात तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे आणि कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम यांना 24 हजार 500 रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंध पथकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी तसेच कंत्राटदार लाच घेऊन काम करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून तालुका कृषी अधिकाऱ्यासह मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी आणि कंत्राटी ऑपरेटरला लाच घेताना पकडले.

तक्रारदार हा ठिबक सिंचन साहित्याचा डीलर असून त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरवल्याबाबतच्या संचिका विजय नरवडे या मंडळ अधिकाऱ्याला सादर न करता परस्पर तपासून घेतल्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी, तसंच अनुदान प्राप्त 35 फाईल करिता प्रत्येकी 700 रुपये फाईल याप्रमाणे 24 हजार 500 रुपये ची लाच मागणी केली. सागर नलावडे यांनी ही लाच स्वीकारली, तसंच बाळासाहेब निकम कृषी अधिकारी यांनी मूळ लाच मागणीशिवाय अधिकचे 1000 रुपये हे स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करून ते 1000 रूपये स्वीकारले.

महसूल विभागही रडारवर!

सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील महसूलचे काही अधिकारी तसेच कर्मचारी रेतीतस्कर झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला प्रोत्साहन देण्याचे काम महसूल कर्मचारी करीत आहेत. लोकांची कामे वाऱ्यावर आणि स्वतःचे खिशे गरम करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. याकडे मंत्री सत्तार लक्ष देतील काय? असा सवाल आहे.

About विश्व भारत

Check Also

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला …

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *