वृक्षारोपणाचे पैसे काढून देण्यासाठी 1 लाखाची लाच घेताना वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी)कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांना ताब्यात घेण्यात आले.
ही घटना आज 6 एप्रिलला सकाळी 11 वाजता करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक खंडेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल काढून देण्यासाठी 5 टक्क्यांची मागणी करण्यात येत होती. वृक्षारोपण कामाचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदारांसोबत अडीच टक्केची बोली झाली.
मात्र, त्यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. ठरल्याप्रमाणे आज बुब यांच्या शासकीय निवासस्थानी व्यवहार करण्याचे ठरवले. तक्रारदाराकडून 1 लाख घेताना बुब यांना ताब्यात घेण्यात आले. बुब यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता तिथे 6 लाख 40 हजार आढळून आले. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.