सोनिया गांधी, माफिया अतिक अहमद आणि जमीन! वाचा प्रकरण

माफिया अतिक अहमदने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्‍या नातेवाईकांचीही जमीन हडपण्‍याचा प्रयत्‍न केला होता. तत्‍कालीन काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती, असे एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे.

माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवार, १५ मार्च रोजी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. अतिक आणि अश्रफ दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना माध्‍यम प्रतिनिधी म्‍हणून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी गोळीबार केला होता. यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच अतिकचा मुलगा असद हा उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर इन्काऊंटरमध्ये मारला गेला होता. तीन दिवसांत अतिकच्या कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने प्रयागराजमधील ४० वर्षांपासूनचा माफियाराजही संपले. यानंतर अतिक अहमदच्‍या अनेक प्रकरणे चव्‍हाट्यावर येत आहे.

२००७ मध्‍ये सोनिया गांधींच्‍या नातेवाईकांची जमीन हडपण्‍याचा प्रयत्‍न

२००४ लोकसभा निवडणुकीत अतिक अहमद हा फुलपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकला होता. सलग पाचवेळा आमदार असणारा अतिक खासदार झाला. या काळात माफिया अतिक आणि त्याच्या गुंडांची दहशत इतकी होती की, लोक त्याच्या परवानगीशिवाय आपली जमीन विकू शकत नव्हते. जमीन, दुकान, घराचे व्‍यवहार हे अतिकला विचारुन करावेत, असा अलिखित नियमच झाला होता. अतिक त्या मालमत्तेचे दर स्वतःच्या मर्जीनुसार ठरवत असे. २००७ मध्‍ये अतिक अमहदने प्रयागराजमधील काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांचे सासरे फिरोज गांधी यांच्‍या चुलत बहीण वीरा गांधी याची सिव्‍हिल लाइन्‍समधील जमीन ताब्‍यात घेतली होती.

सोनिया गांधींना करावा लागला होता हस्‍तक्षेप

‘टाईम्‍स ऑफ इंडिया’च्‍या वृत्तानुसार, वीरा गांधी यांची प्रयागराज सिव्‍हिल लाइन्‍स पॅलेस सिनेमाजवळ घर आणि जमीन अतिकने बेकायदेशीररीत्‍या ताब्‍यात घेतले होते. यावेळी अतिकची दहशत एवढी प्रचंड होती की, स्‍थानिक पोलीस आणि राज्‍य सरकारचे अधिकारी वीरा गांधी यांच्‍या मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर वीरा गांधी यांनी तत्‍कालीन काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍याकडे मदत मागितली. सोनिया गांधी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्‍यांनी उत्तर प्रदेशच्‍या तत्‍कालिक काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षा रिटा बहुगुणा यांना या प्रकरणात हस्‍तक्षेप करण्‍यास सांगितले होते. यानंतर रिटा बहुगुणा यांनी जिल्‍हा प्रशासनाला याबाबत चर्चा केली. अखेर अतिक अहमद याला वीरा गांधी यांना जमीन परत करावी लागली होती.

वीरा गांधी यांचे मौन, रिटा बहुगुणा यांनी दिला दुजोरा
अतिक अहमद याची हत्‍या झाल्‍यानंतर वीरा गांधी यांनी त्‍यांच्‍या जमीन हडपण्‍याच्‍या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्‍यास नकार दिला. मात्र रिटा बहुगुणा यांनी या प्रकाराला दुजारो दिला आहे. वीरा गांधी यांच्‍या जमिनीबाबत सोनिया गांधी यांनी मला हस्‍तक्षेप करण्‍यास सांगितले होते. यानंतर मी जिल्‍हा प्रशासनाला फोन केला होता. यानंतर अतिकने या प्रकरणातून माघार घेतली होती, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अतिक अहमदची १हजार १६९ कोटी रुपयांची संपत्ती जप्‍त

उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच अतिक अहमदच्‍या संपत्तीची माहिती देणारे निवदेन दिले होते. यामध्‍ये त्‍याची सुमारे १ हजार १६९ कोटी रुपये इतकी संपत्ती असल्‍याचे म्‍हटले होते. ही सर्व संपत्ती सरकारने जप्‍त केली आहे. अतिकने २०१९ लोकसभा निवडणूक वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती, तेव्हा त्याने केवळ २५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली होती.

About विश्व भारत

Check Also

भारत-पाक तनाव के बीच सपा की मांग से सियासी हलचल!

भारत-पाक तनाव के बीच सपा की मांग से सियासी हलचल! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

पाकिस्तानी गोलीबारी से हूई अधिकारी की दर्दनाक मौत  

पाकिस्तानी गोलीबारी से हूई अधिकारी की दर्दनाक मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *