सुप्रीम कोर्टातील चार न्यायमूर्तीना कोरोना : महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार परिणाम? वाचा

देशात कोरोनाने डोकेदुखी वाढविली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.सुप्रीम कोर्टात पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाली. सुप्रीम कोर्टातील चार न्यायमूर्तीना कोरोनाची लागण झाली.

कोण न्यायमूर्ती?

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, एस रवींद्र भट, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायाधीशांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झालंय. सुप्रीम कोर्टात वकील, पक्षकार, नागरिक यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.यामुळे महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

सभी वर्ण साथ बनेंगे दूल्हा- दुल्हन : सभी वर्ग विशेषज्ञ कराएंगे विवाह।

सभी वर्ण साथ बनेंगे दूल्हा- दुल्हन : सभी वर्ग विशेषज्ञ कराएंगे विवाह। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *