Breaking News

गडचिरोलीत चालत्या दुचाकीवर पडली वीज : पती-पत्नी, 2 मुली ठार

Advertisements

गडचिरोली जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने पती, पत्नीसह दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरीजवळ घडली.

Advertisements

मृतकांची नावे

Advertisements

भारत राजगडे(३५), अंकिता राजगडे(२८), चिऊ राजगडे(१), देवांशी राजगडे(४) अशी मृतांची नावे असून, हे कुटुंब देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी होते. भारत राजगडे हे आपल्या कुटुंबासह पुराडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलधोकडा येथे लग्नाला मोटारसायकलने गेले होते.

कार्यक्रम आटोपून परत येताना देसाईगंजनजीकच्या दूध डेअरीजवळ पोहचताच रिमझिम पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते एका झाडाखाली थांबले. यावेळी अचानक वीज कोसळल्याने चौघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

मराठवाड्यात पावसाला सुरुवात : सिल्लोडच्या केळणा नदीला पूर : सोयगावमध्ये रिपरिप

महिनाभर खंड पडलेल्या पावसाला बुधवारपासून औरंगाबादमध्ये रिपरिप सुरुवात झाली. गुरुवार आणि शुक्रवार रोजी पावसाचा जोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *