Breaking News

भाजप चिंतेत : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कशी जिंकणार? उत्तर प्रदेशात सर्वे सुरु

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या सर्व ८० लोकसभा मतदारसंघात भाजपाने एका खासगी संस्थेकडून सर्व्हे केला आहे. मतदारसंघातील वातावरण पाहून त्याप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी हा सर्व्हे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेकडून करण्यात येणारा सर्व्हे पुढील काही महिने सुरूच ठेवला जाणार असून दर तीन महिन्यांनी याचा अहवाल राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाला दिला जाईल. मात्र, महाराष्ट्र विधानसभा संदर्भात भाजपच्या गोठात चिंतेचे वातावरण आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्र सत्तेत असले तरी भाजपची डोकेदुखी कमी झालेली नाही. उत्तर प्रदेशच्या सर्व्हेतून तीन महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

एक म्हणजे भाजपाची मतदारसंघात काय परिस्थिती आहे, दुसरे म्हणजे, मतदारसंघातील लोकांसाठी महत्त्वाचे विषय कोणते आणि विरोधी पक्षांची त्या मतदारसंघातील परिस्थिती, यावर खासगी संस्था लक्ष ठेवून असल्याचे भाजपामधील एका नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले.

सर्व्हे करण्यामागची भूमिका काय?

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत मतदारांच्या काय भावना आहेत, विद्यमान खासदाराच्या कामगिरीवर मतदार समाधानी आहेत का? मतदारसंघात भाजपाचे इतर संभाव्य उमेदवार कोण आहेत? आणि त्या मतदारसंघात विरोधी पक्षाची स्थिती किंवा कामगिरी कशी आहे,असा सर्वे असेल.

अयोध्येत राम मंदिरत होत आहे. ज्यावेळी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येईल, तेव्हा त्याचा भव्य-दिव्य असा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून लोकांचा कल पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने झुकेल आणि अँटी-इन्कम्बन्सी काही प्रमाणात कमी होईल. या सर्व्हेमध्ये राम मंदिर आणि इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करत असताना जनतेला त्याबद्दल काय वाटते, हेदेखील जाणून घेतले जाणार आहे. तसेच जागतिक स्तरावर भारताचे वजन वाढत असून सुशासनाचा लोकांच्या मनावर काय परिणाम होत आहे, याचाही अंदाज घेतला जाईल,”, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली. भाजपा संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेशी जोडलेल्या एका नेत्याने सांगितले, “आता ज्याप्रकारचा सर्व्हे केला जात आहे, तो निवडणूक जाहीर होईपर्यंत सुरूच असेल. सर्व्हे करणारी संस्था दर तीन महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल. निवडणुकीला दोन महिने उरले असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा अंतर्गत सर्व्हे केला जाणार आहे. खासगी संस्थेने दिलेला अहवाल आणि कार्यकर्त्यांनी गोळा केलेली माहिती या दोघांचे विश्लेषण करून उमेदवार निवडीची अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि निवडणूक प्रचारात कोणत्या मुद्द्यांना स्थान द्यायचे, हेदेखील ठरविण्यात येईल.”

About विश्व भारत

Check Also

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *