Breaking News

तपासाविना ट्रॅव्हल्सला पीयुसी : ‘रॉयल’ सेंटरचा परवाना रद्द‎ : समृद्धी अपघात प्रकरण

Advertisements

समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सची पीयुसी अपघातानंतर काढण्यात ‎आली होती.ही बाब तपासादरम्यान‎ उघडकीस आली होती. या प्रकरणात पीयूसी देणाऱ्या रॉयल पीयुसी सेंटरचा परवाना‎ उपप्रादेशिक परिवहन विभागाने अखेर रद्द केला ‎आहे.

Advertisements

इतकेच नव्हे तर ट्रॅव्हल्स मालक‎ महिलेच्या पोलिस उपनिरिक्षक‎ पतीचा जबाबही या प्रकरणात नोंदवण्यात आला ‎आहे.

Advertisements

नागपूर येथून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ‎ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २९ बीई १८१९ चा समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ भीषण‎ अपघात झाला. त्यात अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सने‎ पेट घेऊन तब्बल २५ प्रवाशांचा जागेवरच‎ कोळसा झाला. ३० जून रोजी मध्यरात्रीनंतर ‎ ‎ घडलेल्या या घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन ‎ ‎ विभागाने ट्रॅव्हल्सच्या कागदपत्रांची आणि इतर ‎ ‎ बाबींची तपासणी सुरू केली. त्यात प्राथमिक चौकशीमध्ये केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सची पीयुसी ३० जुन २०२३‎ रोजी वैध नसल्याचे आढळून आले होते.

मात्र त्यानंतर ४ जुलै रोजी शासनाच्या एम-परिवहन ‎ ‎ अॅपवर पीयुसी ३० जुन २०२४ पर्यंत वैध‎ असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष ‎म्हणजे, ही पीयुसी १ जुलै रोजी काढण्यात‎ आल्याचे पुढे आले आहे. वाहनाची पीयुसी‎ काढण्यासाठी वाहन पीयुसी केंद्रावर नेऊन‎ तपासणी करणे आवश्यक असते. असे‎ असताना ३० जूनच्या मध्यरात्रीनंतर‎ अपघातात जळालेल्या ट्रॅव्हल्सची पीयुसी १‎ जुलै रोजी काढलीच कशी हा प्रश्न निर्माण‎ झाला होता. दरम्यान, उपविभागीय प्रादेशीक परिवहन‎ अधिकारी कार्यालयाने या प्रकरणात‎ चौकशी सुरू करुन ही पीयुसी देणाऱ्या‎ रॉयल पीयुसी केंद्र चालकाला व‎ ट्रॅव्हल्सच्या मालकालाही नोटीस दिली‎ होती.

त्या दोघांना जबाब नोंदवण्यासाठी‎ बुधवारी पाचारण करण्यात आले होते. मात्र‎ पीयुसी केंद्र चालक हजर न झाल्याने‎ तातडीने कारवाई करीत त्याच्या पीयुसी‎ सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला. तर‎ ट्रॅव्हल्स मालक प्रगती दरणे यांची प्रकृती‎ ठिक नसल्याचे कारण सांगत त्यांच्या वतीने‎ त्यांचे पती पोलिस उपनिरिक्षक भास्कर‎ दरणे यांनी कार्यालयात जावुन जबाब‎ नोंदवीला. अपघातानंतर पीयुसी देणाऱ्या‎ केंद्र चालकावर कारवाई करण्यात आली.‎ आता ती पीसयुसी काढणाऱ्या ट्रॅव्हल्स‎ मालकावर काय कारवाई होणार याकडे‎ सर्वांचे लक्ष लागले आहे.‎

सेंटरच्या तपासणीकडे दुर्लक्ष‎

एखाद्याला पीयुसी सेंटर सुरू करायचे‎ असल्यास पार्कींगची प्रशस्त जागा,आवश्यक‎ उपकरणे आणि इतर बाबी असणे आवश्यक‎ आहे.ही बाब लक्षात घेऊन पीयुसीसाठी अर्ज‎ करणारे परवाना मिळण्यासाठी त्या सर्व बाबींची‎ पूर्तता करतात.मात्र एकदा परवाना मिळाला‎ की,त्यानंतर पीयुसी सेंटर सोईच्या ठिकाणी‎ किंवा चक्क आरटीओ कार्यालयासमोर‎ हलवण्यात येते. मात्र परवाना दिल्यानंतर या‎ सेंटरच्या नियमीत तपासणीकडे दुर्लक्ष होत‎ असल्याने या बाबी उघडकीस येत नाही किंवा‎ त्याकडे कुणी गांभीर्याने लक्षही देत‎ नाही.त्याचाच फायदा या सेंटर चालकाकडून‎ घेण्यात येताना दिसत आहे.‎

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अयोध्‍येला जाण्‍यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्‍वे

उत्तर प्रदेशातील अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे …

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *