विदर्भातील नागपूर विभागात पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, पावसामुळे नागपूर विभागातील अनेक भागात 875.84 हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.
अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार नागपूर विभागात 13 जुलैपासून पूर आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली आणि भंडारा येथे प्रत्येकी तीन, वर्धा आणि गोंदियामध्ये प्रत्येकी दोन आणि चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
अहवालानुसार, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 1,601 घरे आणि झोपड्यांचे नुकसान झाले, तर 39 पशुधनही मरण पावले. पाऊस आणि पुरामुळे नागपूर विभागातील 875.84 हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे.