Breaking News

वकिलाचे भर रस्त्यात आंदोलन ; खड्ड्याने कारचे नुकसान

शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही पालिका उपाययोजना करत नाही. रस्त्याच्या खड्ड्यावरून शुक्रवारी कारने प्रवास करताना वाहनाचे नुकसान झाल्याने संतप्त माजी नगरसेवक अॅड.कैलास लोखंडे यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी रस्त्यात कार थांबवून खड्ड्यावर बसून तासभर ठिय्या मांडला.

आधीच भुसावळ शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहे. त्यात पावसाने आहे त्या रस्त्यांची दुरवस्था होऊन खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांचा अंदाज येत नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता न्यायालयात येताना अॅड. कैलास लोखंडे याच्या कारचे चाक गांधी पुतळ्याजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात रुतले. यामुळे अचानक दणका बसून कारचे नुकसान होऊन ती जागीच बंद पडली.

यामुळे पालिकेच्या निषेधार्थ अॅड. लोखंडे यांनी रस्त्यावरील खड्ड्याजवळ बसून तासभर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या कामकाजाचा निषेध केला. ते मुख्याधिकाऱ्यांना भेटून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्था दूर करा, यासाठी निवेदन देणार आहेत.

About विश्व भारत

Check Also

एसटी बसचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ

सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी …

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *