Breaking News

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा, पण…!

राज्याच्या जमाबंदी आयुक्त अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

परीक्षा टप्पे कसे?

*पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

*दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

*तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

*२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

👉सावधान!

कुणीही आमिष देऊन नोकरीवर लावून देण्याचा दावा करू शकतो. तलाठी पदी नियुक्ती करून देतो, यासाठी अमुक-तमुक रक्कम लागेल, असे बोलले जात आहे. मात्र, यात तथ्य नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवहान केले जात आहे.

About विश्व भारत

Check Also

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

महावितरण कंपनीत जंबो भरती : पात्रता काय?

प्रत्येक बेरोजगार युवकास नौकरी मिळण्याचे स्वप्न असते. त्यातही सरकारी नौकरी मिळत असेल तर त्यासाठी उड्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *