Breaking News

पोलीस भरतीसाठी बोगस प्रमाणपत्र : पोलीस भरती घोटाळा

Advertisements

राज्यात पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भूकंपग्रस्तांचं बोगस प्रमाणपत्र बनवून पोलिसाची नोकरी मिळवण्याचे प्रकार घडले. अशाच एका रॅकेटचा पुण्यात भांडाफोड झाला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस शिपाई गोविंद इंगळेचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

बनावट भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचं एक रॅकेट परभणीत नुकतंच उघडकीस आलं. त्याच्या चौकशीत पुण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली गेली. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आलाय. अशाच प्रकारे आणखीही कोणी पोलिसाची नोकरी मिळवलीय का याची चौकशी करण्यात येतेय.

Advertisements

काय आहे मोडस ऑपरेंडी
लातूर, परभणी, नांदेड या भागात मोठ्या प्रमाणावर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत. भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्ताचं एक बोगस प्रमाणपत्र एक लाख 40 हजार ते अडीच लाखापर्यंत मिळतं. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्ताला पकडून कोर्टात खोटा दावा दाखल केला जातो. कोर्टाबाहेर तडजोड करुन प्रमाणपत्र मिळवलं जातं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हेच बोगस प्रमाणपत्र वापरलं जातं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

यवतमाळात वनरक्षक चाचणीत धावला ‘डमी’ उमेदवार : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावचा उमेदवार

वनरक्षक पदासाठी घेतलेल्या भरती प्रक्रियेत धाव चाचणीत चक्क ‘डमी’ उमेदवार धावल्याची बाब उघडकीस आली आहे. …

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपालांनी केले निलंबित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *