Breaking News

छगन भुजबळ यांच्या कानाखाली लावा आणि एक लाख मिळवा…!

Advertisements

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विधानानंतर वाद वाढणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात, असे वक्तव्य भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले होते. तसेच काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचे शिक्षण झाले ते महापुरुषांमुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले करुन दिली, असे भजबळ म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.

Advertisements

पुण्यात काय झाली घोषणा
जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. यापूर्वीही छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती. ते सातत्याने हिंदू समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करीत आहेत. विशिष्ट समाजाचा विरोधात गरळ ओकतायेत. त्यांनी कोणाची पुजा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु समाजात तेढ निर्माण करु नये, असे परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी म्हटले आहे.

Advertisements

छगन भुजबळ संतापले
सरस्वती आणि शारदा देवीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ नाशिकमध्ये रविवारी मीडियावर भडकले. तुम्ही एक बाजू सांगता, तशी दुसरी पण माझी बाजू असते. ती दुसरी बाजू मांडणार असाल, तरच यापुढे मी तुमच्याशी बोलेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. सरस्वती आणि शारदा देवी हे आमचे देव आहे, त्यांची पूजा केली पाहिजे. परंतु शिक्षणाची दारे आपल्याला फुले दाम्पत्य, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी उघडी करुन दिली.

भूमिका बदलणार नाही
मी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेल, असे काही नाही. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही. यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *