नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल

नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. यात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोविंद बालाजी कोंडावार (24), सुप्रिया बालाजी कोंडावार (50), बालाजी कोंडावार (55 तिघेही रा. कोंडावार बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा) आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (43), प्रियम्बडा सुशील दुबे (दोघेही रा. ए / 307 चितौडगड बिल्डींग, अंबे माता मंदिर जवळ, खरीगांव, भाईंदर, मुंबई (पु.) अशी आरोपींची नावे आहे. तर पंकजसिंग जितसिंग (48) रा. हजारी पहाड असे फिर्यादीचे नाव आहे.

माहितीनुसार, पंकजसिंग जितसिंग हे सेल्स इंटरनॅशनल वितरक सीडीआय बुक्स पब्लिकेशनचे मालक असून ते बुक सप्लायचा व्यवसाय करतात. 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023 दरम्यान आरोपींनी संगनमत करून त्यांच्या पुस्तकांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी पुस्तकांचा पुरवठा केल्यावरही त्यांचे 1 कोटी 5 लाख 45 हजार 794 रुपये थकवण्यात आले. नागपुरात अलिकडे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. विशेषत: ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे खूप वाढलेले आहे. सामान्य नागरिकांनी सावध राहाण्याच्या सुचना पोलिसांनी देऊनही नागरिक बळी पडत आहे.

ऑनलाइन गेमच्या नावावर सट्टा लावून जास्त नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना सर्वतोमुखी होऊनही नागरिक सावध होत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. याप्रकरणी गोंदियातील आरोपी अनंत नवरतन जैन याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जिथे पोलिसांनी 10 कोटींहून अधिक रोख रकमेसह चार तोळ्यांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले होते. दुबईला पळून गेलेला या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.

About विश्व भारत

Check Also

प्रफुल्ल गुडधे देणार फडणवीसांना जोरदार टक्कर

दक्षिण-पश्चिम नागपूर या आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा …

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *