Breaking News

राज्यातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर

राज्य शासन शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंदाेलन संपुर्ण राज्यात छेडणार आहे.

प्रमोद तौनकर (शिक्षक समिती, जिल्हाध्यक्ष) आणि जोतिराम पाटील (शिक्षक समिती) म्हणाले शिक्षक भरती करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. शिक्षक कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे शिक्षकांची अपूरी संख्या भरली पाहिजे. त्यातच शिक्षकांनी वृक्षाराेपण करणे, मतदार नाेंदणी करणे आदी कामे करावीत असे बंधनकारक केले जात आहे.

अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांकडून लक्ष देणं शिक्षकांना कठीण होत आहे तसेच शैक्षणिक दर्जा देखील ढासळत असल्याची तक्रार या प्राथमिक शिक्षकांनी केली.

सर्व गाेष्टींचा निषेध करण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सव्वा लाखापेक्षा अधिक शिक्षक 5 सप्टेंबरला सामूहिक रजेवर जाणार आहेत. कोल्हापुरातील हजारो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत असे पदाधिका-यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

IAS माधवी खोडे नागपूर विद्यापीठच्या नव्या कुलगुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडून तडकाफडकी कार्यभार काढून घेण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *