अमित शहा उद्या मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या घरी जाणार : काय आहे कारण?

देशाचे केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा शनिवारी (23 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी अमित शाह मुंबईत येणार आहेत. मागील वर्षीही अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले होते. यावर्षीही ते सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. यानंतर अमित शहा भाजप नेत्यांच्या घरी जाऊनही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

असा असेल अमित शहा यांचा मुंबई दौरा?

दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळ
3 वाजता : लालबाग राजा दर्शन
3.50 ते 4 : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे बाप्पाचे दर्शन
4 ते 4.15 : सागर येथे देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट तसेच गणरायाचेही दर्शन घेणार.
4.30 वाजता : वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या नेर्तृत्वाखालील सार्वजनिक गणपतीचे दर्शन
5.30 ते 7 : मुंबई विद्यापीठात लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमात हजेरी
7 वाजता दिल्लीसाठी रवाना
25 मिनिटे लालबागला थांबणार

लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी लालबागमध्ये उपस्थित असणार आहेत. ते 25 मिनिटे येथे थांबणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांनी सुरेक्षेचीही तगडी व्यवस्था केली आहे.

मागील दौऱ्यात झाली होती सुरक्षेत चूक

मागील वर्षी अमित शहा हे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळीही त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. मात्र, यादरम्यान अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले होते. एक अनोळखी व्यक्ती अमित शहांच्या जवळ फिरत होती. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे सुरक्षारक्षकांना भासवले होते. बराच वेळ तो अमित शहांच्या अवती-भोवती फिरत होता. संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली होती.

भाविकांची गर्दी

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही राज्यभरातून लाखो भाविक लालबागला येत आहेत. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाच्या चरणी गणेश प्रतिष्ठापनेच्या पहिल्याच दिवशी 42 लाख रुपये रोख व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दान आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *