Breaking News

अजित पवार उभारणार नागपुरात कार्यालय

विदर्भातील जनतेला काम करवून घेण्यासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार एक विशेष अधिकारी नियुक्त केले जाणार आहे. जनतेची कामे जलद गतीने व्हावी म्हणून नागपुरातील शासकीय निवासस्थान राजगड येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक आज विजयगड घेतली. यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. पक्ष वाढीचा एक भाग म्हणून एक उपमुख्यमंत्री कक्ष नागपुरात असावे, अशी कल्पना त्यांना आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात कार्यालय असून त्यांचे येथे विशेष कार्यसीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरात कार्यालय सुरू करणार आहेत.

तसेच एक विशेष कार्यसिन अधिकारी नियुक्त करणार आहेत. दरम्यान, नागपूर शहरातील पक्षसंघटनेची सद्यस्थिती अजित पवार यांनी जाणून घेतली. सोबतच नागपूर शहर आणि परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी व तक्रारींची निवेदने स्वीकारण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात संघटनेची क्षमता अधिक प्रभाविपणे प्रतिबिंबीत होण्यासाठी अजित पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे, ओबीसी सेल राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, शहराध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि …

नागपूर : KTPS कंझूमर्स सोसाइटी अध्यक्ष विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार

नागपूर : KTPS कंझूमर्स सोसाइटी अध्यक्ष विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *