आरोग्य विभागात 50 कोटींचा घोटाळा : मंत्री तानाजी सावंतवर ठपका?

राज्याच्या आरोग्य विभागात मोठा घोटाळा झाल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी आज विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आरोग्य विभागाच्या एकूण भ्रष्टाचाराच्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये बोलताना आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आम्ही उघड केला. आरोग्य विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. भ्रष्टाचारामध्ये बदल्यांचा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे. पैसे घेतल्याशिवाय बदल्या होत नाहीत”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. “नियम डावलून पदोन्नती केली जाते, म्हणजे ज्युनिअर माणसाला सहसंचालक पदापर्यंत, एकतर नागपूरच्या उपसंचालकाची बदली पहिल्यांदा केली आणि दुसऱ्या दिवशी ती बदली रद्द केली. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार संबंधित खात्याने आणि मंत्र्यांनी केला”, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

असे अनेक विषय आहेत. या आरोग्य यंत्रणेचं संपूर्ण बट्ट्याबोळ करण्याचं काम झालं आहे. आरोग्य विभागात खूप मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. पण जवळपास 1200 डॉक्टरांची बदली ही बदली नियमबाह्य केली आणि प्रत्येकी 4 लाख रुपये त्या ठिकाणी घेतल्या गेल्याची माहिती आहे”, असा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. “जवळपास 50 कोटी रुपये या बदल्यांमध्ये वसूल केले गेलेत. दोन संचालकांची पदे बोली लावून रिक्त ठेवली आहेत, म्हणजे जो जास्त देईल त्यासाठी ती पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संचालकांची दोनही महत्वाची पदे आरोग्य खात्याची रिक्त राहावीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे या संवेदनशील अशा खात्यात केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. आरोग्य विभागामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेची परमिशन द्यायची आहे. हॉस्पिटलला तर 30 ते 35 लाख रुपये मोजल्याशिवाय देत नाही”, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

‘सुविधा लोकांचा जीव वाचवण्यासाठी की…?’
“आरोग्य सुविधा या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे की या खात्याच्या लोकांचं पोट भरायसाठी आहे? हा खरा प्रश्न उपस्थित झालाय. मुंबई महापालिकेतही खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा पाऊस सुरु आहे. लोकप्रतिनिधी राहिले नाही, अधिकाऱ्यांना कोणाचा धाक करायला नाही. अधिकारी मनाप्रमाणे, त्या डेव्हलपर बिल्डरला हाताशी धरून तिजोरीची लूट केली जात आहे. हेही अत्यंत खेदाने आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

सुधीरभाऊंसाठी ‘लाडक्या बहिणी’ बनल्या रणरागिणी

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू …

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *