Breaking News

ख्रिसमस अर्थात प्रेम, मानवतेचा संदेश

Advertisements

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा नाताळ होय. त्याच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा ईस्टर हे दोन महत्त्वाचे सण होत. नाताळ हा मूलतः प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. ख्राईस्ट मास अर्थात ख्रिस्त जन्मानिमित्त केली जाणारी सामूहिक प्रार्थना म्हणजेच ख्रिसमस होय. ही प्रार्थना अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. येशू ख्रिस्ताने सामान्य माणसाच्या आयुष्याला नवे आणि आध्यात्मिक वळण दिले. येशूंनी दिलेला मार्ग प्रेम आणि पवित्रतेवर आधारित होता. त्यांच्या या संदेशामुळे जगात एक नवी पहाट निर्माण झाली.

Advertisements

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उत्सव-सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ख्रिस्ती धर्मीयांचा नाताळ अर्थात ख्रिसमस हा यापैकीच एक. ख्रिस्ती समजात तुलनेने खूपच कमी सण साजरे केले जातात. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा नाताळ आणि त्याच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा ईस्टर हे दोन महत्त्वाचे सण होत.

Advertisements

संत युहान्ना यांनी लिहिले आहे, परमेश्वराने जगावर एवढे प्रेम केले की, आपला लाडका पुत्र जगाला दिला. जेणेकरून त्याच्यावर जो विश्वास ठेवेल त्याचा नाश तर होणार नाहीच उलट अत्यंतिक आनंदाची प्राप्ती त्याला होईल. नाताळ हा ईश्वराचे अनंत प्रेम, आनंद आणि उद्धाराची साक्ष देणारा आनंदसोहळा आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तेव्हापासून तो साजरा केला जात आहे. ख्रिश्चन धर्मियांच्या मान्यतेनुसार, प्रभू येशू म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला.

सेक्स्टस् ज्युलियस अफ्रिकनसने 221 मध्ये पहिल्यांदा 25 डिसेंबर हा येशूचा वाढदिवस म्हणून साजरा केला. या दिवसाला ख्रिसमस डे म्हणण्याचे एक कारण म्हणजे हिवाळी संक्रांतीच्या वेळी रोमन लोक 25 डिसेंबर रोजी सूर्याचा जन्म साजरा करतात. दुसरीकडे असेही एक मत आहे की, जगाच्या निर्मितीच्या चौथ्या तारखेला म्हणचे 25 मार्च रोजी मेरीची गर्भधारणा झाली. याच्या बरोबर 9 महिन्यांनी म्हणजे 25 डिसेंबर रोजी येशूचा जन्म झाला. त्यामुळेही या दिवसाला ख्रिस्त धर्मियांमध्ये एक वेगळे महत्त्व आहे. ईश्वराचा प्रेषित असणार्‍या येशूने क्रूसावर प्राण त्यागून ईश्वराचे असीम प्रेम प्रकट केले. या प्रेमाने प्रेरित होऊन लाखो लोकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि येशूच्या प्रेमाचा आणि शुभवार्तेचा संदेश प्रसृत करणे हेच आपले जीवितकार्य मानले. त्यासाठी प्रसंगी बलिदानही दिले. प्रेम धैर्यवान आणि कृपाळू असते. प्रेम कधीही बढाया मारत नाही, असे संत पोलूस यांनी लिहिले आहे.

काही उल्लेखांनुसार, पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 6 जानेवारी मानला जात असे. साडेसोळाशे वर्षांपूर्वी पोप यांनी 25 डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस मानावा असे फर्मान काढले. तेव्हापासून 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. जगाच्या मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ठिकाणी मात्र 25 डिसेंबरच्या संध्याकाळी तो साजरा केला जातो. प्राचीन रोमन राज्यात 25 डिसेंबर ही सूर्याची जयंती मानली जाते. जगातील अनेक धर्म, संस्कृती सूर्यपूजक आहेत. अंधाराची लोकांना भीती वाटते. अंधार नष्ट करणारा म्हणून सूर्याचे पूजन केले जाते. रोमन संस्कृतीने 25 डिसेंबर हा सूर्याचा जन्मदिवस मानून सूर्याशी नाते जोडून घेतले. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी हाच दिवस सर्वांत मोठ्या सणासाठी निवडून त्याच संस्कृतीशी नाते जोडले. ख्रिस्तपूर्व रोमन साम्राज्यात 25 डिसेंबरला सूर्यदेवाच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. तोच दिवस ‘ख्राईस्ट मास’ म्हणजे येशूच्या जन्मानिमित्त होणारी सामूहिक प्रार्थना म्हणून साजरा केला जातो. तोच ख्रिसमस किंवा नाताळ होय!

24 आणि 25 डिसेंबरच्या मधील रात्र म्हणजे ख्रिसमसचा अपूर्व सोहळा साजरा करण्याची रात्र. ख्रिसमस ट्री दिव्यांनी सजविले जातात. लोक एकमेकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा देतात. घरेदारे तोरणांनी आणि रोषणाईने सजविली जातात. प्रसाद ग्रहण केला जातो. पूर्वी ख्रिसमस ट्री केवळ जर्मनीत होते. आता ते जगभर दिसतात. ख्रिसमसच्या वेळी कॅरोल्सचा समावेश सर्वप्रथम ब्रिटनमध्ये झाला, तर आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली, असे मानले जाते. ख्रिसमस कार्ड 1846 मध्ये प्रथम तयार केल्याचा उल्लेख आढळतो, तर 1868 मध्ये सांताक्लॉजचा उल्लेख सर्वप्रथम झाल्याचे आढळते. रात्रीच्या वेळी लहान मुले आपला मोजा घराबाहेर अडकवून ठेवतात आणि सांताक्लॉज त्यात भेटवस्तू टाकून जातो, अशी ही परंपरा आहे.

नाताळ हा प्रेमाची देवाणघेवाण करण्याचा दिवस आहे. निगर्वी प्रेम कधीच नष्ट होत नाही, असा या सणाचा संदेश आहे. प्रेमाची भावना जोपासल्यास सर्व पूर्वग्रह नष्ट होतील आणि सर्व प्रकारची हिंसा, दहशत या जगातून संपुष्टात येईल, असा आशावाद जागविणारा ख्रिसमसचा हा सण आहे. मानवजातीच्या उद्धारासाठी ईश्वराने केलेल्या कृपेची आठवण करून देण्याचा सण म्हणजे नाताळ. मनुष्याचा उद्धार म्हणजे परमेश्वराने मानवाला दिलेले दान आहे. पाप वाढू दिल्यास ते ईश्वराच्या इच्छेविरुद्ध असेल. त्यामुळे चांगली कृत्ये करून परमेश्वराचे प्रेम मिळवा, असा संदेश नाताळ देतो.

‘बायबल’मध्ये त्यागाचा उल्लेख अनेकदा आढळतो. देह त्यागाचाही त्यात समावेश आहेे. रक्त अर्पण केल्याशिवाय उद्धार होत नाही. त्यामुळेच येशू ख्रिस्ताने क्रूसावर प्राणत्याग केला आणि जगाचा उद्धार केला. सर्वांना परस्पर प्रेमाने जोडणारे जीवन मनुष्याला प्रदान करण्यासाठीच येशूचा जन्म झाला. परमेश्वराचे प्रेम प्राप्त करण्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा, अशी धारणा जगभरात अनेक समुदायांमध्ये आहे. परंतु; परमेश्वराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जग सोडून जाणे गरजेचे नाही. संसारातील आपली कर्तव्ये पार पाडून, एकमेकांशी साहचर्य राखून, प्रेमाने व्यवहार करून परमेश्वराच्या जवळ जाता येते, असा संदेश देणारा ख्रिसमसचा सण आहे. येशू ख्रिस्तानेही मानवजातीच्या कल्याणाचा वसा घेऊन सर्वांच्या गरजा जाणल्या आणि परस्पर साहचर्य, प्रेमाचा संदेश देऊन एकमेकांशी प्रेमाने व्यवहार करण्याची ऊर्जा दिली. त्यामुळेच जन्मदिवस हा प्रेमसोहळा आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:301)चक्रवर्ती सम्राट दशरथ-कौशल्यानंन्द नंदन मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्म और रामनवमी की महिमा

(भाग:301)चक्रवर्ती सम्राट दशरथ-कौशल्यानंन्द नंदन मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्म और रामनवमी की महिमा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

(भाग:300) देवी देवता और असुर भी करते हैं माता सिद्धिदात्री की नवधा भक्ति पूजा अर्चना और प्रार्थना

(भाग:300) देवी देवता और असुर भी करते हैं माता सिद्धिदात्री की नवधा भक्ति पूजा अर्चना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *