Breaking News

भंडाऱ्यातील वरठीच्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले

भंडारा शहराजवळील वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनीत मंगळवारी (ता. 2) पहाटे 03.15 वाजता स्फोट झाला. या स्फोटात तीन श्रमिक जखमी झालेत. जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले.

घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या आणखी आठ श्रमिकांनाही दुखापत झाले आहे. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही घटना घडली. घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाल्याचे श्रमिकांनी सांगितले. भागात कार्यरत तीन श्रमिक यात भाजले आहेत. तंत्रज्ज्ञ नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार यांचा जखमीत समावेश आहे. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. स्फोट एवढा भयानक होता की, कंपनीतील जवळपास असलेला परिसर हादरला. या अपघातात कंपनीतील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

About विश्व भारत

Check Also

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल:शहीदों को श्रद्धांजलि

आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल: शहीदों को श्रद्धांजलि टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *