Breaking News

नागपूर?चंद्रपुरातील अनेक पेट्रोल पंप कोरडे

Advertisements

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने नागपूर, चंद्रपूर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केली. परिणामी शहरातील निम्मे पेट्रोल पंप एका रात्रीत कोरडे ठाक झाले. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील मुल मार्गावरील पेट्रोल पंपावर ग्राहक व व्यवस्थापकांत शाब्दिक चकमक उडाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

Advertisements

पेट्रोलअभावी आज स्कूल बसही बंद होत्या. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सोमवारी रात्री ११ वाजतापर्यंत तसेच आज सकाळी सहा वाजपासून पेट्रोल पंपांवर गर्दी आहे.

Advertisements

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शेजारी असलेला खजांची पेट्रोल पंप इंधन साठा संपल्याने रात्रीच बंद करण्यात आला. यामुळे आजुबाजूच्या पेट्रोल पंपांवर गर्दी दाटली. महाकाली मार्गावरील पंपही बंद होता. चंद्रपूर जिल्हा आणि शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर असे चित्र दिसून येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *