नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यावर बंदूकीतून गोळी झाडली!

नागपुरातील बजाजनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या पायातून बंदुकीची गोळी आरपार गेली होती. या प्रकरणात सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून गोळी सुटल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पोलीस चौकशीत संकेत यांच्यावर गोळी झाडल्याचे पुढे आल्याने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ५ मे २०२२ ला गणवेश घालताना सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडल्याने गोळी सुटली व ती डाव्या पायातून आरपार जाऊन उजव्या पायात फसली. बजाजनगर पोलिसांनी मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ, वीरसेन धावले, कोमल गायकवाड, डॉ. सुधीर देशमुख यांचे म्हणणे नोंदवले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. चौकशीदरम्यान संकेत आणि इतरांनीही दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे पुढे आले. गोळी सुटली नाही तर झाडली गेली, त्यामुळे त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होता काय, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

 

दरम्यान, एका महिला अधिकाऱ्याने यापूर्वी आरटीओतील एका मोठ्या अधिकाऱ्याला खोट्या तक्रारीत अडकवण्यासाठी तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे तार त्या घटनेशी जुळल्याचीही चर्चा आरटीओतील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या विषयावर नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गोळी सुटली नसल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत असल्याचे चौकशीत दिसत असल्याचे मान्य केले. याबाबत बजाज नगर पोलिसांत तक्रारही दिल्याची माहिती त्यांनी दिली. बजाजनगर पोलीस निरीक्षकांनी खूप व्यस्त असल्याचे सांगत बोलणे टाळले.

प्रकरण काय?

बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. संकेत घरून कर्तव्यावर जाण्यासाठी गणवेश परिधान करतांना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे त्या गडबडीत रिव्हॉल्वर डाव्या बाजूला खाली पडून त्यातील बुलेट फायर झाली. ही बुलेट त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरी मध्ये जाऊन फसल्याचा संकेतचा दावा होता. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर वेगळाच प्रकार पुढे आला.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *