Breaking News

माजी मंत्र्याच्या तोतया PA कडून वनविभागात नोकरीचे आमिष : पोलिसांनी केली अटक

माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांचा खाजगी सचिव (पीए) ‎असल्याचे सांगून वन विभागात नोकरी ‎‎देण्‍याचे आमिष दाखवत एका जणाने ‎‎सहा तरुणांची २ ‎‎‎लाख २९ हजार ‎‎‎रुपयांची फसवणूक केली. या तोतया ‘पीए’ ला फसगत झालेल्या ‎‎‎तरुणांनीच‎‎ पकडून ‎बडनेरा ठाण्यात नेले.याप्रकरणी‎ तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी ‎फसवणुकीचा गुन्हा दाखल करून‎ आरोपीला ताब्यात घेतले आहे.‎ सचिन रवींद्र मोंढे (३२, रा. निंभोरा,‎बडनेरा) असे या ठकबाजाचे नाव‎ आहे. या प्रकरणात बडनेरा कंपासपुरा‎ येथील प्रवीण परसराम अतकरी (५२)‎ यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रवीण अतकरी हे पानठेला चालवत‎ असून, त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा ‎लहान मुलगा हा बीए प्रथम वर्षात‎ शिकत आहे.

सचिन मोंढे हा‎ प्रवीण अतकरी यांच्या पानठेल्यावर‎ नेहमी यायचा, त्यामुळे त्याच्यासोबत‎ अतकरी यांची ओळख झाली होती. ‎त्यावेळी त्याने तुमचा मुलगा काय‎ करतो, मी आमदार प्रवीण पोटे यांचा ‘पीए’ असून तुमच्या ‎मुलाला वन विभागात सरकारी नोकरी लावून‎ देवू शकतो. तसेच तुमच्या ओळखीचे‎ आणखी काही तरुण असतील, त्यांनाही सांगा.‎ नोकरीसाठी मला प्रत्येकी साडेतीन लाख रुपये ‎द्यावे लागतील. तसेच पहिल्यांदा ३० हजार‎ रुपये द्या, उर्वरित रक्कम मुलाच्या पगारातून‎ कापून घेईल, असे त्याने सांगितले.‎त्याचवेळी त्याठिकाणी येणाऱ्या इतरही मुलांना‎ सचिन मोंढेने नोकरी लावून देतो, असे आमिष ‎देऊन प्रत्येकी साडेतीन लाख रुपये लागणार‎ असे सांगितले. त्यावेळी सहा जण तयार झाले.‎

२५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रवीण‎ अतकरी यांनी ३६ हजार रुपये ऑनलाइन, तर‎ इतर पाच जणांनी‎ एकूण २ लाख २९ हजार रुपये त्याला दिले.‎ त्यानंतर रक्कम देणारे तरुण त्याला नोकरीसाठी‎ विचारणा करीत होते, तर तो उडवाउडवीची ‎उत्तरे देत होता. त्यानंतर त्याला रक्कम परत ‎मागितली तर टाळाटाळ करीत होता. त्यानंतर‎ अतकरी व रक्कम देणाऱ्या इतरांनी त्याची‎ माहिती घेतली असता तो आमदार प्रवीण पोटे यांचा ‘पीए‎’ नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्याला पकडून बडनेरा पोलिसांसमोर हजर‎ केले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल‎ करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. अजूनही‎ काही व्यक्तींकडून त्याने रक्कम‎ घेतल्याची शक्यता नाकारता येत ‎नसल्‍याने या प्रकरणाचा ‎सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा!

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हरिद्वार। भारत …

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *